-->

वणी शहरातील पाणी टंचाई संदर्भात आमदारांचे तातडीचे निर्देश.

0

 वणी शहरातील पाणी टंचाई संदर्भात आमदारांचे तातडीचे निर्देश.

वणी:-  वणी शहरात मागील काळापासून सतत पाणीटंचाई सदृश स्थिती आहे.  रांगणा येथून पाणी पुरवठा करणारी योजना कित्येक वर्षांपासून चालढकल स्थितीत आहे.  परिणामी शहराला पाणीटंचाई च्या झळा सोसाव्या लागत असल्याने विद्यमान आमदार संजय देरकर यांनी रांगणा येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत ताबडतोब उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहे. Urgent instructions from MLAs regarding water shortage in Wani city.

वणी शहरातील पाणी टंचाई संदर्भात आमदारांचे तातडीचे निर्देश.




     मागील काही दिवसांपासून वणी शहरातील बहुतांश भागात गंभीर पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली आहे. यंदा चांगला पाऊस पडूनही शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणी मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजनेचे कामे सुरू करण्यात आली होती. शहरापर्यंत पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आली होती.  मात्र प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे रांगणा येथे येणाऱ्या जल वाहिनीचे कामच चालढकल स्थितीत आहे.  परिणामी वणी शहरातील बहुतांश भागात पाणीटंचाई सदृश स्थिती निर्माण झाली.  नागरिकांना पाणीटंचाई चा सामना करावा लागला.  शहरातील जनतेला पाणी मिळत नसल्याची बाब विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ रांगणा येथे २० सप्टेंबर ला सकाळी सात वाजता प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. व त्याठिकाणी उपस्थित असलेल्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक यंत्रणा व मनुष्यबळ लावून पाणीपुरवठा व्यवस्थापन सुधारावे.  जेणेकरून नागरिकांना दररोज नियमित व नियोजित वेळेत पाणी मिळेल याची खबरदारी घ्यावी व येत्या आठ दिवसांत वर्धा नदीवरून वणी शहरासाठी पाणीपुरवठा सुरू करावा.  असे स्पष्ट निर्देश विद्यमान आमदारांनी उपस्थित संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहे.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top